चांदण्यांची कोजागरी
शुभ्र चांदणे खुलले नभात,
मोती विखुरले अंगणात,
मंद वाऱ्याचा सुखद गारवा,
नात्यांमध्ये मायेचा गोडवा.
“कोण जागे?” विचारी लक्ष्मी, येऊन आपल्या दारी,
भक्तीभावे स्वागत करू, उजळून दीपांच्या हारी,
हळदीकुंकू, फुले वाहू, जोडू हात भक्तीने,
सुखसमृद्धी नांदू दे, घर भरू दे प्रीतीने.
केशर, वेलची दुधात दरवळे,
बदाम, पिस्त्यांनी गोडवा खुलले,
चंद्रप्रकाशी ठेवू दुधाची वाटी,
प्रसाद वाटू साऱ्यांच्या ओठी.
गप्पा रंगल्या, गाणी सजली, हास्य फुलले ओठांवर,
आठवणींची मैफल जमली चांदण्यांच्या गच्चीवर,
कुणी म्हणावे भक्तिगीत, कुणी धरावा ताल,
आपुलकीच्या सहवासात सुखावला भवताल.
मनामनांत प्रेम वाढू दे, आनंद नांदू दे घरोघरी,
चंद्रासम शीतलता लाभू दे प्रत्येकाच्या अंतरी,
दुधामधली गोडी उतरू दे आपल्या या संसारी,
नाती उजळून साजरी होऊ दे चांदण्यांची कोजागरी!
© Sukanya Yogesh (2026)
All rights reserved.
No part of this poetry may be reproduced, distributed, or transmitted in any form or by any means, including photocopying, recording, or other electronic or mechanical methods, without the prior written permission of the author, except in the case of brief quotations used in reviews, articles, or academic work, with proper attribution.

